जन्म सिनेमाचा...
नमस्कार मित्रांनो, माझ्या या ब्लॉग लेखनाची सुरवात कशी करावी याचा विचार मनात घोळत असतांना एक अप्रतिम पुस्तक माझ्या हाती आले. मग ठरवलं कि या पुस्तकाच्या सहाय्यानेच पहिला ब्लॉग लेख लिहावा. माझ्या नुकत्याच वाचनात आलेले हे पुस्तक म्हणजे एच.एन. नरहरि राव यांचे 'द मोस्ट मेमोरेबल फिल्म्स ऑफ द वर्ल्ड' होय. या पुस्तकात जगातील उत्तम असे १३० चित्रपट आणि त्यांची माहिती दिली आहे. माझ्यासारख्या चित्रपट वेड्या माणसाला हा मोह आवरण तसं अवघडच. म्हणून ठरवलं हीच असावी माझ्या ब्लॉगची सुरुवात. चित्रपटांच्या जन्माचा इतिहास या पुस्तकाच्या सौजन्याने आपणास सांगावा असे वाटले.
२८ डिसेंबर १८९५ रोजी जगाच्या इतिहासात प्रथमच निवडक प्रेक्षकांसमोर एका-एका मिनिटांचे असे दहा चलतचित्रे दाखवली गेली. स्थळ होते हॉटेल ग्रान्ड काफे, पेरिस, फ्रांस(GRAND CAFE, PARIS, FRANCE). एका नंतर एक असे अरायव्हल ऑफ द ट्रेन, गार्डनर विथ अ वाटरिंग होस, वर्कर्स लिव्हिंग द फक्टारी(FACTORY), दिमोलिशन (DEMOLITION) ऑफ अ वॉल, ब्रेकफास्ट सीन या चित्रफिती दाखवण्यात आल्या आणि हेच ठरले जगातील पहिले चित्रपट. हे सारे चित्रपट ओगस्ट ल्युमिएर आणि ल्युई ल्युमिएर या बंधूंनी तयार केले होते. त्यांनी स्वतःच आपला केमेरा (CAMERA) आणि प्रोजेक्टर बनवला. त्याला त्यांनी 'सिनेमाटोग्राफ' असे नाव दिले. सिनेमा हे नाव देखील त्यांच्या या उपकरणामुळेच पडले. हि दिसणारी सारी चित्रे वास्तव दुनियेतीलच मात्र चक्क हलत होती. हा अनुभव सगळ्यांनाच चमत्कारिक वाटत होता. अखेर २८ डिसेंबर १८९५ ला सिनेमा नावच एक नवीन विश्व जन्माला घातलं. ल्युमिएर बंधू हे 'चलतचित्रांचे जनक' म्हणून इतिहासात नोंद झाली ती कायमची.
सिनेमा भारतात कसा आला?
ल्युमिएर बंधूंचा सहाय्यक मॉरिस सोस्तिए हा ऑस्ट्रेलियाला निघाला होता, वाटेत तो भारतात उतरला (मुंबई). एक रुपया तिकिटाने त्याने हेच खेळ दाखवले.व्यावसायिक चित्रपटांचा हा भारतातील पहिलाच खेळ होता. मुंबई मधील वेटसन हॉटेल मध्ये ७ जुलै १८९६ ला ५० फुटांच्या या सहा फिल्म्स दाखवल्या गेल्या. फ्रांस मध्ये जन्माला येउन अवघ्या सहा महिन्यात सिनेमा भारतात पोहचला. याच खेळाला हरिश्चंद्र भाटवडेकर उपस्थित होते. याची प्रेरणा घेत त्यांनी परदेशातून केंमेरा (CAMERA) आणि प्रोजेक्टर मागवून घेतला. मुंबईत एका कुस्ती सामन्याचे चित्रण केले आणि त्याचे १९०१ मध्ये प्रदर्शन करण्यात आले. ल्युमिएर बंधूंच्या मुंबईतील चित्रपट प्रदर्शनाचा द टाइम्स ऑफ इंडियाने 'द मार्व्हल ऑफ सेंच्युरी' असे वर्णन केले.
अशाप्रकारे चलतचित्रांचा अर्थात सिनेमाचा जन्म झाला, एक चमत्कारच घडला आणि जगाच्या इतिहासात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.
लेखाचा उत्तरार्ध पुढच्या भेटीवेळी पाहू, तोपर्यंत नमस्कार....

पुढच्या लेखाची वाट पाहत आहे
ReplyDelete